पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या तिघांना पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी (दि.१९) तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोमी सुरेश नेहलानी (वय ३६ वैष्णव माता मंदिराजवळ, पिपरी), विनोद राजू सतिजा (वय ३२, रा. पिंपरीगाव) आणि लखन राजू गुरुबानी (वय २४ रा. पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी पिंपरीत राहण्यास असून तळेगाव दाभाडे येथे जाऊन सट्टाबाजार करत होते.

हेही वाचा – संरचना मजबुतीचे प्रमाणपत्र १५ दिवसांत सादर न केल्यास फौजदारी कारवाई; पिंपरी महापालिका आयुक्तांचा जाहिरात फलकधारकांना इशारा

आयपीएल क्रिकेट सामने सुरू आहेत. आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग लावणाऱ्यांची माहिती काढून कारवाई केली जात आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. तळेगाव दाभाडे येथील लेक पॅराडाईज सोसायटी रो हाऊस नंबर ४४ येथे आयपील क्रिकेट सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.

हेही वाचा – पुणे : रॅप गाणे प्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठाकडून उच्च स्तरीय समिती

आरोपींकडून सात मोबाईल फोन, एक लॅपटॉप, पाच वह्या, दोन पेन आणि चार हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ९६ हजार ७८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार व पाच इंडियन टेलीग्रॅम अ‍ॅक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे पुढील तपास करत आहेत.