पुणे : राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्याने पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांनी पुणे विभागातील निसर्गरम्य ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत विविध पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणी मज्जाव करण्यात येत आहे. समांतर पातळीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या आहेत.

पुणे जिल्ह्याच्या परिसरात धरणांचे जाळे आहे. जिल्ह्यात पाच प्रमुख नद्या आहेत आणि त्यांच्या पाण्यावर तब्बल २५ धरणे बांधण्यात आली आहेत. त्यातून पुणेकरांची तहान भागवली जाते आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणी दिले जाते. पुण्यातून वाहणारी मुठा, पिंपरी-चिंचवडमधून जाणारी मुळा या प्रमुख नद्यांबरोबरच घोड, भीमा आणि निरा या नद्यांचे पाणी साठवण्यासाठी ठिकठिकाणी धरणे बांधली आहेत. याबरोबरच जिल्हा निसर्गरम्य ठिकाणांनी बहरला आहे. पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत असणाऱ्या माळशेज, लोणावळा, भाजे, कार्ले, महाबळेश्वर, पाचगणी, कोयना धरण आदी निसर्गरम्य ठिकाणी पावसाळ्यात पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. यंदा मोसमी पाऊस विलंबाने सक्रिय झाला. मात्र, घाटमाथ्यावर दमदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी धबधबे, पाणथळ ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात होत आहे. पावसामुळे रस्ते, घाट, पायवाटा निसरड्या झालेल्या असतात. दरड कोसळण्याच्यी शक्यता असते. अतिवृष्टी होण्याची शक्यता असते, असे असताना हौसी आणि हुल्लडबाज पर्यटकांकडून गैरवर्तन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याचे प्रकार घडले असून, यंत्रणेवर त्याचा देखील ताण येत आहे.
या पार्श्वभूमीवर पर्यटन महामंडळाने माळशेज, कोयना धरण, सिंहगड, पानशेत आदी निवासस्थानांच्या ठिकाणी वन विभागाच्या साहाय्याने धोकादायक ठिकाणे निश्चित करून या ठिकाणी सूचनाफलक लावले आहेत. अनेक ठिकाणी लोखंडी कठडे उभारले आहेत, सेल्फी पॉइंट किंवा छायाचित्र काढण्यासाठी गर्दी असणाऱ्या धोकादायक ठिकाणी देखील पर्यटकांना मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?

हेही वाचा>>>मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणारे रॅकेट उघडकीस, तीन महिलांची सुटका

पावसाळी पर्यटनामध्ये माळशेज घाटाला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पसंती असते. या ठिकाणच्या निवासस्थानाबरोबरच कोयनानगर, महाबळेश्वर आणि कार्ला येथील पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी खबरदारी म्हणून धोकादायक ठिकाण पर्यटकांनी सतर्क राहण्याबाबतच्या आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच संबंधित ठिकाणी पर्यटकांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तसेच सेल्फी पॉइंट काढून टाकण्यात आले आहेत, लोखंडी जाळ्या-कठडे बसविण्यात आले आहेत. पर्यटकांनी सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा.-मौसमी कोसे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, पुणे विभाग