शिक्षण प्रसारक मंडळीच्या एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अखंड भारताचे १५ फूट लांब, दहा फूट रुंदीचे नकाशारूपी मानचित्र साकारण्यात आले आहे. हा त्रिमितिय स्वरुपातील असल्यामुळे विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन रुपासह इतिहासात झालेल्या वेगवेगळ्या विभाजनांपूर्वी प्राचीन भारतातील प्रदेश, त्यांची पूर्वीची नावे विद्यार्थी पाहू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : दिवाळीतील आतषबाजीसाठी नियमावली ; फटाके विक्री स्टाॅल परिसरात आतषबाजीस मनाई

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या नकाशाचे उद्घाटन झाले. संस्थेचे अध्यक्ष ॲड. एस.के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, सुधीर काळकर, नियामक मंडळ सदस्य पराग ठाकूर, अशोक वझे, संस्थेच्या सचिव डॉ. राधिका इनामदार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. ॲड. मिहीर प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, बकेट डीझाईन या डिझाईन स्टुडिओ हृषिकेश राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चार महिने संशोधन करून तीन महिन्यात नकाशाची निर्मिती करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : येरवड्यातील मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर अत्याचार ; पोलिसांकडून एका रुग्णाच्या विरोधात गुन्हा

त्रिमितिय नकाशामुळे भारताच्या भूभागासह सर्व डोंगररांगा, पठारे, नद्या, समुद्र जसेच्या तसे पाहता येतात. भगतसिंग कोश्यारी म्हणाले, अखंड भारत आपण प्रत्यक्षात पाहिलेला नाही, पण नकाशामुळे तो पाहता येतो. आजपर्यंत कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अशाप्रकारे अखंड भारताचा नकाशा मी पाहिलेला नाही. या नकाशाद्वारे भारताचा गौरवपूर्ण इतिहास भूगोलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जाईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagat singh koshyari unveiled akhand bharat 3d map in spm english medium school pune print news zws