पुणे : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटामध्ये गांधीची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी रविवारी (२९ जानेवारी) पुणेकरांना लाभणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक प्रकाश मगदूम लिखित ‘गांधींची सिनेचरित्र गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रभावळकर यांच्या हस्ते होणार असून नेमाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आशय फिल्म क्लब, आशय सांस्कृतिक क्लब आणि विजय जाधव प्रतिष्ठान यांनी हा योग जुळवून आणला आहे. महात्मा गांधी हे जगातील सर्वांत जास्त चित्रीकरण झालेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. पण, गांधींना चित्रपट हा प्रकार कधीच आवडला नाही. या अनोख्या नात्यातील अद्वैत मगदूम यांनी ‘द महात्मा ऑन सेल्युलाॅईड… ए सिनेमॅटिक बायोग्राफी’ म्हणजेच गांधींची सिनेचरित्र गाथा या पुस्तकातून उलगडले आहे. हार्पर काॅलिन्स प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला २९ जानेवारी रोजी होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमास अभिनेते-लेखक गिरीश कुलकर्णी आणि कला अभ्यासक व समीक्षक अभिजित रणदिवे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आशयचे सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी दिली.