पिंपरी : भामा-आसखेड धरणातून थेट जलवाहिनीव्दारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला प्रशासकीय स्तरावर गती देण्यात आली असून आतापर्यंत वरिष्ठ स्तरावर तीन बैठका झाल्या आहेत. जलवाहिनीचे काम आवश्यक असेल तेथे पोलीस बंदोबस्तात सुरू असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

भामा-आसखेड धरणातून थेट जलवाहिनीव्दारे १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने ज्या ठिकाणी जागा ताब्यात मिळाली आहे त्या ठिकाणी जलवाहिनीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलवाहिनीसाठी पालिकेला तात्काळ जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका समितीची नेमणूक केली आहे. तसेच तीन बैठकादेखील झाल्या आहेत.

pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
Pune redevelopment old buildings, Pune old buildings, Stalled redevelopment old buildings pune,
पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !
Pimpri, Pimpri property under tax, Pimpri latest news,
पिंपरी : अडीच लाख मालमत्ता कर कक्षेत, ३०० कोटींचा महसूल वाढणार
civic problem in vadgaon sheri assembly constituency
अपुरा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी कोणत्या मतदारसंघात आहेत या समस्या !
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

हेही वाचा – “मुलीला कोयता हल्ल्यातून वाचवलं याचा अभिमान, पण धाकधुकही, कारण…”, लेशपाल जवळगेच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वन विभाग, जलसंपदा विभागाच्या जागेतून जलवाहिनी टाकण्यात येत आहे. सध्या जलवाहिनीचे वेगाने आणि आवश्यक असेल तेथे पोलीस बंदोबस्तात कामकाज सुरू आहे. काही ठिकाणी जलवाहिनीसाठी आवश्यक असलेली उर्वरित जागाही दोन महिन्यांच्या आत पालिकेच्या ताब्यात येईल, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.