भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे २१ वे अधिवेशन यंदा पुण्यात होणार असून, १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राज्याचे कामगार व गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट व संघाचे राष्ट्रीय संघटनमंत्री कृष्णचंद्र मित्रा आदी उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती संघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत धुमाळ यांनी दिली. अधिवेशन १२ व १३ एप्रिल या कालावधीत रमणबाग प्रशालेत होणार आहे. ‘गावागावात मजदूर संघ व सर्वाना किमान वेतन तसे सामाजिक सुरक्षा’ हे यंदाच्या अधिवेशनाचे ब्रीदवाक्य आहे. अधिवेशनात संघटित, असंघटित कामगारांचे प्रश्न कामगार कायद्यात होणारे बदल आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (१२ एप्रिल) दुपारी शोभायात्रा काढण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharatiy majadur sangh session prakash mehta