राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या विजयाचा जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी करण्यात आला. शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका भवन परिसरात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतही पुरेसे संख्याबळ नसताना भारतीय जनता पक्षाचे पाच उमेदवार विजय झाले. भारतीय जनता पक्षाचे नेता देंवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाल्यानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात आला. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. धनंजय जाधव, राजेश येनपुरे, गणेश घोष यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharatiya janata party victory elections pune print news amy