व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करुनही आणखी १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. १५ लाख रुपये न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने तक्रारदाराला दिली होती.पराग गायकवाड (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिलेच्या पतीने आरोपीकडून १२ ते १५ टक्के व्याजदराने आठ लाख रुपये घेतले होते. व्याजासह गायकवाडला १९ लाख रुपये देण्यात आले होते. त्यानंतर गायकवाडने तक्रारदार महिला आणि पतीला धमकावण्यास सुरूवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याकडे लाचेची मागणी ; दौंडमधील महसूल सहायकाला पकडले

तु्म्ही मला खूप त्रास दिला आहे. तुमच्याकडून अजून रक्कम येणे बाकी आहे, असे सांगून गायकवाडने महिला, तिचे पती आणि सासू-सासऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने पतीसह भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी गायकवाडला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharti university police arrested a man for demanding an extortion pune print news amy