भीमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले विद्रोही कवी वरवरा राव यांना श्वसनास त्रास होत असल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राव यांना विशेष न्यायालयाने रविवारी ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
Bhima Koregaon Case: Activist Varavara Rao taken to Sassoon hospital after complaining of difficulties in breathing. He was sent to police custody till 26 November by Pune sessions court yesterday.
— ANI (@ANI) November 19, 2018
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणात पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना २८ ऑगस्ट रोजी छापेमारी करीत अटक केली होती. मात्र, आपल्यावर केलेली अटकेची कारवाई बेकायदा असल्याचे सांगत यातील काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर वरवरा राव हे स्थानबद्ध होते. हैदराबाद हायकोर्टाने तीन आठवड्यांसाठी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. ही मुदत शनिवारी संपली. त्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा एकदा त्यांना अटक करण्यात आली होती.
रविवारी पुणे येथील विशेष न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी सकाळी त्यांनी श्वसनास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.