न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र संस्कृत काव्यबद्ध करणारे ‘भीमायनम्’कर्ते प्रा. प्रभाकर शंकर ऊर्फ प्र. शं. जोशी (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. जयंत जोशी हे त्यांचे चिरंजीव होत.
जोशी यांनी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीबरोबरच भीमराव रामराव अकबरवीस शिष्यवृत्तीही संपादन केली होती. संस्कृत भाषेचे अभ्यासक आणि अध्यापक असलेल्या जोशी यांनी काव्यकोविद, काव्यतीर्थ या पदव्या मिळविल्या होत्या. विद्यार्थ्यांना संस्कृत विषय सुलभपणे शिकविण्यासाठी त्यांनी कथासरित सागर, सुभाषित रत्न कलश, गद्य-पद्यमाला, संस्कृत विहार अशा पुस्तकांची निर्मिती केली होती. जोशी यांनी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पूना अॅथलॅटिक्स असोसिएशन, पुणे जिल्हा चित्रकला शिक्षक संघ या संस्थांचे अध्यक्षपद भूषविले होते. दहा वर्षांपूर्वी दृष्टिदोष असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र संस्कृतमध्ये रचण्याचा मानस त्यांनी जिद्दीने आणि ध्येयाने प्रेरित होऊन पूर्णत्वास नेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा