पुणे: भोजपुरी फिल्म अभिनेत्री आणि मॉडलिंग करणाऱ्या तरुणींना जाळ्यात ओढून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलालाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून दोन तरुणींची सुटका करत एका दलालास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस केली आहे. पैशाचे आमिष दाखवून भोजपुरी फिल्म अभिनेत्री व मॉडलिंग करणाऱ्या तरुणींना वेश्याव्यवसायात ओढणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
पंचतारांकित हॉटेलमध्ये संबंधित तरुणींना बोलून ग्राहक पाठवून दलाल वेश्याव्यवसाय म्हणजे सेक्स रॅकेट चालवायचा. याबाबत पिंपरी- चिंचवडच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला याची माहिती मिळाली. संबंधित पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणाहून दोन तरुणींची सुटका केली असून दलालास पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी एक भोजपुरी फिल्म मधील अभिनेत्री असल्याचे समोर आलं असून दुसरी तरुणी मॉडलिंग करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा चित्रपट क्षेत्र आणि सेक्स रॅकेट असं नातं उघड झालं आहे.