पुणे: व्यावसायिकाकडे पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करुन त्याच्याकडील १८ लाख रुपये चोरुन नेण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबा आयरा शाब, माधुरी माेरे, राॅकी वैद्य, किशोर पांडागळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराला आरोपींनी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी काही विधी करावे लागतील, अशी बतावणी केली होती.

हेही वाचा… मेट्रोकडे पुणेकरांची पाठ! प्रवासी संख्येला घरघर; उत्पन्नातही मोठी घट

आरोपींनी व्यावासयिकाला हडपसरमधील ससाणेनगर परिसरात विशाल बिनावत याच्या घरी नेले होते. व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी त्याच्याकडील १८ लाखांची रोकड असलेली पिशवी चोरली. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhondu baba stole 18 lakhs rupees from the businessman on the pretense of showering him with money in hadapsar pune print news rbk 25 dvr