पिंपरी : भोसरीचे मैदान सलग दोनवेळा सहज मारल्यानंतर आता तिसऱ्या वेळी भाजप उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्यासमोर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. भोसरीत लांडगे-गव्हाणे यांच्यात दुरंगी आणि चुरशीची लढत होत आहे. आमदार लांडगे यांनी विकासाच्या मुद्द्यावर, तर गव्हाणे यांनी सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार, प्रलंबित प्रश्न यांवर भर दिला आहे.

शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र स्वरुपाचा हा मतदारसंघ. २००९ मध्ये निर्मिती झालेल्या या मतदारसंघातून पहिल्यांदा विलास लांडे अपक्ष निवडून आले. २०१४ मध्ये भाजपची लाट असतानाही महेश लांडगे अपक्ष म्हणून विजयी झाले. भाजपशी घरोबा करून २०१७ मध्ये त्यांनी कमळ हाती घेतले. २०१९ मध्ये लांडगे भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातर्फे लढलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासोबत लांडगे, माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे असतानाही केवळ ९ हजार ५७२ इतक्याच मतांचे अधिक्य आढळराव यांना मिळाले होते.

hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

हेही वाचा – पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान

महायुतीमध्ये भोसरी मतदारसंघ भाजपकडे कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने विधानसभा लढविण्यासाठी गव्हाणे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून समर्थक माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता माजी आमदार लांडे यांच्यासह भोसरीतील पूर्ण राष्ट्रवादी गव्हाणे यांच्यासोबत आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे रवी लांडगे आणि गव्हाणे यांच्यात रस्सीखेच झाली होती. हा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मिळाला आणि गव्हाणे यांनाच उमेदवारी मिळाली. रवी लांडगे यांची नाराजी दूर करण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले. भोसरीत शिवसेनेची मतपेढी असून, त्याचा गव्हाणे यांना फायदा होईल असा कयास आहे.

तत्कालीन आमदार विलास लांडे यांच्यावरील नाराजांची मोट बांधून २०१४ मध्ये अपक्ष आणि २०१९ मध्ये भाजपकडून, असे सलग दोनदा लांडगे विजयी झाले. दोन्ही वेळेस त्यांनी लांडे यांचा पराभव केला. सन २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात लांडगे यांनी मोठी भूमिका बजावली होती. महापालिकेत सत्ता आल्यानंतर समाविष्ट गावातील नितीन काळजे, राहुल जाधव यांना महापौर केले. परंतु, शब्द देऊनही काहींना महापालिकेतील पदे देता आली नाहीत.

हेही वाचा – पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान

दहा वर्षांत नाराजीही वाढली. परिणामी, आठ माजी नगरसेवकांनी साथ सोडली. २०१४ मध्ये सोबत असलेले अनेकजण आता विरोधात दिसत आहेत. त्यामुळे लांडगे यांच्यासमोर आव्हान निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडून दहा वर्षांत केलेला विकासाचा मुद्दा मांडला जात आहे. समाविष्ट गावांत झालेली कामे त्यांच्याकडून प्राधान्याने सांगितली जात आहेत. तर, रखडलेली कामे, विकास कामांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारावर गव्हाणे यांचा भर आहे. लांडगे यांच्यावर नाराज असलेले भाजपमधील अनेकजण गव्हाणे यांना मदत करतील, असा आघाडीचा होरा आहे.

असा आहे मतदारसंघ

एकूण मतदार : ६,०८,४२५

पुरुष मतदार : ३,२८,२८०

महिला मतदार : २,८०, ०४८

तृतीयपंथी – ९७

Story img Loader