भोसरी विधानसभेच मैदान कोण मारणार?
भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानापासून चिखलीतील निवडणूक कार्यालयापर्यंत मोठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत कार्यकर्त्यांसह महिलांचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळाला. मी विरोधकांच्या टीकेवर लक्ष देत नाही. भोसरीच्या सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे. मी पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेस जिंकून येईल असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा >>> पक्षातील बंडखोरीचे काँग्रेस समोर आव्हान!
भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरला. महेश लांडगे यांची रॅली त्यांच्या निवासस्थानापासून निवडणूक कार्यालयापर्यंत होती यात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते लांडगे यांचं जागोजागी फुलांची उधळण करून तसेच औक्षण करून स्वागत करण्यात आलं २०१४ ला अपक्ष, २०१९ भाजपमधून आमदार झालेले महेश लांडगे तिसऱ्यांदा बाजी मारणार का? या प्रश्नावर मी नक्की विजय होईल. असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
विरोधकांना काय टीका करायची आहे ते करू द्या. मी त्यावर उत्तर देणार नाही. माझा विजय नक्की असेल असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचं आमदार महेश लांडगे यांच्यासमोर आव्हान असणार आहे. आमदार महेश लांडगे यांची लोकप्रियता आणि भोसरी विधानसभेवर असलेल्या प्रभाव मोडीत काढण्यात अजित गव्हाणे यशस्वी होतात का? ते पाहणं महत्वाचं आहे.