पिंपरी : महिलेने चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी स्वंयघोषीत भाईने साथीदारांसह महिलेच्या घरात घुसून तोडफोड, लुटमार केल्याची घटना भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली. तसेच हवेत कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण केली.

याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास फिर्यादी महिला घरी झोपल्या होत्या. त्यावेळी आरोपी तिथे आले. फिर्यादी महिलेच्या बहिणीने एका आरोपीला चपलेने मारल्याचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या दरवाजा व खिडकीवर दगडफेक करीत काच फोडली.

हेही वाचा…पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले

त्यानंतर महिलेच्या घरात घुसून त्यांची पर्स नेली. जाताना घराबाहेर ठेवलेली वॉशिंग मशीन आणि दुचाकीची तोडफोड केली. हातातील कोयता हवेत फिरवून ‘मी इथला भाई आहे, तुम्ही कोणी मध्ये आलात तर कोणालाच सोडणार नाही’, असे म्हणत दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Story img Loader