पुणे मेट्रोमध्ये परप्रांतीय तरुणांना नोकर्‍या देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर न्यायालयजवळील मेट्रो ऑफिससमोर ठाकरे गटाकडून भूमीपुत्रांना नोकर्‍या मिळाल्या पाहिजे यासाठी ठाकरे गटाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि मेट्रो प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संजय मोरे म्हणाले की, पुणे शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका व्हावी. त्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यात आला आणि आता काही किलोमीटर मेट्रो सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे स्वागतच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान नोकर भरती करतेवेळी त्याची जाहिरात बिहार आणि गुजरातमधील वृत्तपत्रामध्ये देण्यात आल्या. त्यामुळे पुणे मेट्रोमध्ये सध्या ९० टक्के अधिकारी, कर्मचारी हे परप्रांतीय आहेत. तर आपल्या तरुणांना साफसफाईची काम दिली आहेत. मुख्य पदावरील नोकर्‍यापासून आपल्या तरुणांना डावलण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांना नोकर्‍या दिल्या जाव्यात, या मागणीसाठी आज आम्ही आंदोलन करित आहोत. आमच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि फुगेवाडी ते रुबी हॉल या दोन्ही मार्गावरील स्थानकाना महापुरुषांची नावे देण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.