पुणे : जागतिक आरोग्य संघटनेतर्फे पारंपरिक वैद्यक जागतिक परिषद (ट्रॅडिशनल मेडिसिन ग्लोबल समिट) १७ आणि १८ ऑगस्टला गुजरातमधील गांधीनगर येथे होणार आहे. या परिषदेला पारंपरिक वैद्यकीय पद्धती, सार्वजनिक आरोग्य आणि धोरणे या संदर्भात दिशा देण्यासाठी डब्ल्यूएचओने अकरा बाह्य तज्ज्ञांची सल्लागार समिती नियुक्त केली असून, केंद्रीय आयुष मंत्रालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागातील सुप्रतिष्ठ प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन तज्ज्ञ समितीचे सहअध्यक्ष आहेत.

गांधीनगर येथे होणारी परिषद सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याणाच्या दिशेने या संकल्पनेवर आधारित आहे. या परिषदेत सर्वोत्कृष्ट पद्धती आणि क्रांतीकारक पुरावे, विदा आणि नवसंकल्पना, राजकीय कटिबद्धतेचे लक्ष्य, निसर्ग आणि विज्ञानाबरोबरच पारंपरिक वैद्यकीय पद्धतींमध्ये पुरावेनिष्ठ कृती या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. परिषदेच्या अनुषंगाने तज्ज्ञांच्या बाह्य समितीने काही उदयोन्मुख संकल्पना निश्चित केल्या आहेत. संशोधन आणि पुरावे, जागतिक विदा, प्रादेशिक कल आणि सर्वोत्कृष्ट पद्धती, डिजिटल आरोग्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवविविधता आणि शाश्वतता, हक्क आणि स्रोत, बौद्धिक संपदा, अडचणी आणि संधी, कायदा आणि धोरण आराखडा अशा विषयांचा त्यात समावेश आहे.

Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Office Space, Pune, Mumbai, Delhi,
कार्यालयीन जागा सहकार्यात पुण्याचा झेंडा! मुंबई, दिल्लीला मागे टाकत देशात दुसऱ्या स्थानी झेप
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात

हेही वाचा – गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून आता डिजिटल प्रमाणपत्रे, गुणपत्रके

पुरावे आणि विदा, संशोधन पद्धती, जागतिक प्रासंगिकता, संभाव्य प्रभाव आणि इतर बाबींवर आधारित, तांत्रिक पुनरावलोकन निकष आणि परिषदेच्या
संकल्पनेशी सुसंगतता यावर सल्ला देणे, परिषदेत संबोधित केलेल्या मुद्द्यांवर वैज्ञानिक प्रकाशनांच्या विकासावर सल्ला देणे, शिखर परिषदेनंतर प्रमुख धडे आणि प्राधान्य कृतींवर डब्ल्यूएचओसाठी अहवाल विकसित करणे अशी समितीची कार्यकक्षा आहे.

हेही वाचा – सोलापूर रस्त्यावर भरधाव वाहनाची दाम्पत्याला धडक, दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू

पारंपरिक ज्ञान प्रणालीतील नवसंंशोधन आणि नवकल्पना आरोग्याशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. त्यासाठी ‘एक जग, एक आरोग्य, एक कल्याण’ या दृष्टिकोनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याणासाठी एकीकरण, पुराव्यावर आधारित पद्धतींना महत्त्व मिळते. – डॉ. भूषण पटवर्धन, सुप्रतिष्ठ प्राध्यापक, केंद्रीय आयुष मंत्रालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आरोग्यशास्त्र विभाग