लोणावळ्यामधील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह मावळ परिसरात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे बहुतांश धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील धबधबेदेखील वाहू लागले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भुशी धरणदेखील ओव्हरफ्लो झाले असून पायऱ्यावरून पाणी ओसंडून वाहात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी भुशी धरण जून महिन्यामध्येच ओव्हर फ्लो झाले होते. कोसळत असलेल्या पावसामुळे लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्य अधिकच सुंदर दिसत आहे. लोणावळ्यात गेल्या २४ तासांत १५८ मिमी पाऊस कोसळला आहे.

हेही वाचा – पिंपरी : वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांना आर्थिक फटका; उद्योजकांनी केली ‘ही’ मागणी

वर्षाविहारासाठी शेकडो पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असतात. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. आज भुशी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले. भुशी धरण तसेच परिसरातील धबधबे कोसळू लागल्याने पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर चांगला असल्याने धरण ‘ओव्हरफ्लो’ झाल्यावर परिसरातील नागरिक तसेच पर्यटकांनीही या ठिकाणी धाव घेतली. भूशी डॅमच्या पाय-यावरून आणि सांडव्यांवरून पाणी वाहत आहे.

हेही वाचा – पिंपरी : आई-वडील, सासू-सासऱ्यांना सांभाळण्यास नकार देणाऱ्यांची नोकरी धोक्यात; काय आहे प्रकरण?

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. भुशी धरण हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. तरुणांपासून लहानग्यांपर्यंत सर्वच पर्यटक भुशी धरणावर बघायला मिळतात. भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याने लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. लोणावळा पोलिसांनीदेखील वाहतूक कोंडीबाबत कंबर कसली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhushi dam in lonavala which is an attraction for tourists overflows kjp 91 ssb
Show comments