आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शुश्रुषा करणाऱ्या महिलेला दागिने चोरल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. महिलेकडून आठ लाख ७० हजार रुपयांची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. गायत्री सुनील हातेकर (वय २४, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली होती. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिलेची आई बिबवेवाडी भागात राहायला आहेत. त्यांच्या बंगल्यातून २५ तोळे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

हेही वाचा >>> फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तक्रारदार महिलेच्या घरी आईची शुश्रुषा करण्यासाठी आरोपी हातेकर यायची. कोणाचे लक्ष नसल्याची संधी साधून तिने कपाटातून दागिने चोरले होते. पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत तिने दागिने चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या दागिन्यांपैकी साडेआठ लाख रुपयांची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, सहायक निरीक्षक संजय निकुंभ, उपनिरीक्षक शशांक जाधव, आशिष गायकवाड, राहुल शेलार, नितीन कातुर्डे, गोकुळा काटकर यांनी ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bibwewadi police arrest nursing woman for stealing jewellery pune print news rbk 25 zws