दैवीशक्ती प्राप्त झाल्याची बतावणी करुन एका भोंदूने महिलेवर चाकुच्या धाकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरुद्ध बलात्कार, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> अपघातानंतर मित्र पसार, गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू; बिबवेवाडी भागातील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिलेची ओळख होती. दैवीशक्ती अवगत आहे, तसेच माझ्या अंगात संचार होतो, असे सांगून भोंदूने महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर आरोपी महिलेच्या घरी आला. महिला आणि तिची दोन मुले घरात होते. भोंदूने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd