लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मौजमजेसाठी सायकल चोरणाऱ्या दोघांना वारजे पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून ३० सायकली जप्त करण्यात आल्या. चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातील सोसायटीच्या आवारातून सायकल चोरल्याचे उघडकीस आले आहे.

12 lakh fraud by cyber thieves Pune news
मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंटची बतावणी; सायबर चोरट्यांकडून एकाची १२ लाखांची फसवणूक
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Action taken against by municipal corporation panel makers instead of ganesh mandal
गणेश मंडळांना अभय; फलक तयार करणाऱ्यांवर कारवाई
Kothrud Police Arrest Thieves Who Did Chain Snatching Pune news
चेनस्नॅचिंग करणार्‍या चोरट्यांना बेड्याच; परराज्यातील आरोपीचा समावेश  
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
Fraud with retired bank officer withdrawing money from ATM
पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या निवृत्त बँक अधिकाऱ्याची फसवणूक
Police beaten, encroachment, Pimpri,
पिंपरी : पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण काढताना पोलिसांनाच मारहाण
Anti-Corruption Bureau arrested Two police officers
गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच घेणाऱ्या सहायक फाैजदारासह दोघांना पकडले,‘एसीबी’ची वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कारवाई

शिवशंकर राजेंद्र जाधव (वय ३०) अभिषेक प्रकाश जाधव (वय २४, दोघे रा. कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. काही महिन्यांपासून वारजे भागातून सायकल चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांनी तपास पथकाला सायकल चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. कर्वेनगर भागातील दोघांनी सायकली चोरल्याची माहिती पोलीस कर्मचारी सागर सूतकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी जाधव यांना पकडले. त्यांच्याकडून एक सायकल जप्त करण्यात आली. वारजे भागातील शोभापूरम सोसायटीच्या आवारातून त्यांनी सायकल चोरल्याची माहिती मिळाली.

आणखी वाचा-पंतप्रधान आवास योजनेत अनुदान मंजुरीसाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या तिघांना पकडले

चौकशीत दोघांनी कर्वेनगर, वारजे, तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागातून सायकल चोरल्याची कबुली दिली. मौजमजेसाठी सायकल चोरीचे गुन्हे केल्याची माहिती चोरट्यांनी दिली. आरोपी जाधव किरकोळ कामे करून उदरनिर्वाह करतात. दोघांकडून ३० सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सायकल चोरल्यानंतर दोघांनी सायकल विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना सायकलींची विक्री करता आली नाही.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक निळकंठ जगताप, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस कर्मचारीप्रदीप शेलार, मनोज पवार, विजय भुरूक, संभाजी दराडे, विकास पोकळे, अमोल सुतकर, सत्यजित लोंढे यांनी ही कामगिरी केली.