पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण होऊन चोवीस तासांचा कालावधीदेखील उलटला नसताना शनिवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास खंडाळा बोगद्याच्या तोंडाजवळ पुन्हा दरड कोसळली. डोंगरावरील काही सुटे झालेले दगड व माती द्रुतगती मार्गाच्या पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर तासाभरात मदत यंत्रणांनी रस्त्यावरील राडारोडा बाजूला केला. मात्र सुरक्षेच्या कारणासाठी द्रुतगती वरुन मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करुन ती राष्ट्रीय महामार्गाने लोणावळा खंडाळा शहरातून बोरघाटातील अंडा पाँईट येथे पुन्हा द्रुतगतीला जोडण्यात आली. यामुळे लोणावळ्यात मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर १९ जून रोजी खंडाळा बोगद्याजवळ दरड पडल्याने ३३ तास, तर २२ जुल रोजी आडोशी बोगदयाजवळ दरड कारवर पडल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू होऊन वाहतूक ठप्प झाली होती. या घटनांची दखल घेत रस्ते विकास महामंडळाने खंडाळा व खोपोली घाटाची पाहणी करत धोकादायक दरडी काढण्याचे काम २३ जुलै रोजी हाती घेतले. खंडळा व लोणावळा परिसरातील धोकायदायक दरडी काढण्याचे काम ३१ जुलला पूर्ण केले. आजपासून द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी सुरु केला होता. मात्र, धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण होऊन काही तासांचा कालावधी उलटला असतानाच रविवारी दुपारी पुन्हा खंडाळा बोगदयाजवळ दरड पडल्याने अद्यापही द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायकच असल्याचे अधोरेखित झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोणावळ्यात प्रचंड वाहतूक कोंडी
शनिवारच्या सुटीमुळे लोणावळ्यात आज पर्यटकांची वर्दळ होती. त्यातच द्रुतगतीवर दरड पडल्याने सर्व वाहतूक लोणावळ्यातून वळविण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big crag on express way