लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : परदेशी विद्यार्थ्यांना मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांना प्रवेश न देण्याचा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना दिला. युजीसीच्या नियमावलीनुसार भारतात राहणारेच मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र असल्याचे युजीसीने स्पष्ट केले.

official language in india article 343 for official language of the union
संविधानभान : राष्ट्रभाषा नव्हे; राजभाषा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?

युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. युजीसीच्या मुक्त आणि दूरस्थ, ऑनलान अभ्यासक्रम नियमावली २०२०मध्ये प्रवेश पात्रता नमूद करण्यात आली आहे. देशातील कोणत्याही भागात राहणारा विद्यार्थी युजीसीच्या मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थेतील मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमाअंतर्गत कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. विद्यार्थी संस्थेतील प्रादेशिक कार्यक्षेत्रातील असणे आवश्यक असल्याचे या नियमावलीत नमूद केले आहे. तसेच फ्रँचाइज शिक्षण संस्थांतर्फे चालवले जाणारे ऑफ कॅम्पस, मुक्त विद्यापीठांच्या दूरस्थ अभ्यासक्रमांचे अभ्यास केंद्र, शैक्षणिक संस्थांचे प्रसार अभ्यासक्रम आणि नियामक मान्यतेशिवाय राबवले जाणारे अभ्यासक्रम यासाठी विद्यार्थी व्हिसा दिला जाणार नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा-विवाहाच्या आमिषाने चौदा वर्षीय मुलीचे अपहरण करुन बलात्कार

या पार्श्वभूमीवर मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांनी मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच युजीसी नियमावली २०२०नुसार भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक अधिकारक्षेत्राची पूर्तता करून मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांना प्रवेश देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.