लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : किरकोळ बाजारात शंभरी पार केलेल्या टोमॅटोच्या दरात मोठी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. आवक वाढल्याने आठवडाभरात टोमॅटोचे दर निम्माहून कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर ४० ते ५० रुपये किलोपर्यंत आहेत.

Nashik, Kumbh Mela , meeting ,
नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shortage of Wheat flour companies
पीठ कंपन्यांना जाणवतोय गव्हाचा तुटवडा; जाणून घ्या, अन्न महामंडळाची भूमिका किती महत्त्वाची
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
Soyabean Purchase Objective Failed farmers in trouble
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा; जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
helpline enable for farmers to file complaints of fraud zws
नाशिक : शेतकऱ्यांच्या मदतीला आता बळीराजा मदतवाहिनी; फसवणुकीच्या ९०० पेक्षा अधिक तक्रारी

टोमॅटोच्या दरात जुलै महिन्यात टप्याटप्याने वाढ होत गेली. मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर शंभर रुपयांपर्यंत गेले होते. नवीन लागवड केलेला टोमॅटो बाजारात उपलब्ध झाला नव्हता. पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली होती, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-पिंपरी : शहरवासीयांनो, अर्थसंकल्पासाठी ‘ऑनलाइन’ विकासकामे सूचवा; ‘असे’ सुचविता येणार काम

पुणे, मुंबईतील बाजारात पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, आंबेगाव, जुन्नर परिसरातून टोमॅटो मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविले जातात. घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली होती. पुण्यातील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात चार ते पाच हजार पेटी टोमॅटोची आवक व्हायची. पावसाने उघडीप दिल्यानंतर बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. टोमॅटोची आवक दुप्पट झाली आहे. बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाली असून, यापुढील काळात टोमॅटोच्या दरात फारशी वाढ होणार नाही, असे भुजबळ यांनी नमूद केले.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात जुलै महिन्यात चार ते पाच हजार पेटी टोमॅटोची आवक व्हायची. गेल्या तीन ते चार दिवसांत टोमॅटोची आवक वाढली आहे. सध्या बाजारात दररोज दहा ते बारा हजार पेटी टोमॅटोची आवक होत आहे. टोमॅटोची लागवड चांगली झाली असून, पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो बाजारात विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. -विलास भुजबळ, ज्येष्ठ अडते, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

आणखी वाचा-राज्यात मतदार केंद्रांच्या संख्येत पुणे अव्वलस्थानी

आठवड्यापूर्वी किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर प्रतवारीनुसार ९० ते १२० रुपये दरम्यान होते. गेल्या चार दिवसांत टोमॅटोची आवक अपेक्षेपेक्षा जास्त झाली. आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली. -प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजार

टोमॅटोचे दर

घाऊक बाजार – १०० ते २०० रुपये (दहा किलो)

किरकोळ बाजार- ४० ते ५० रुपये (एक किलो)

Story img Loader