शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेजारील मटण शॉप दुकानातील २२ बकऱ्या आणि २ बोकडांचा होरपळून मृत्यू झाला आहे.या आगीत ५ दुकान जळून खाक झाली असून ही घटना आज पहाटेच्या सुमारास पिंपरी-चिंचवड मधील लालटोपी नगर येथे घडली आहे.यात ऐकून ५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या विभागाने दिली आहे.

शहरातील लालटोपी नगर येथे पहाटे पाच च्या सुमारास मारुती टायर दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली,बघता बघता आगीने रोद्ररूप धारण करत शेजारील दुकानांना घेरले यात ऐकून पाच दुकान जळून खाक झाली आहेत.तर शानदार मटण शॉप मधील २२ बकऱ्या आणि २ पाळलेल्या बोकडांचा होरपळून मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे शानदार मटण शॉप मालक आणि मारुती टायर विक्री करणाऱ्या दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देताच घटनास्थळी भोसरी,संत तुकाराम नगर,चिखली,प्राधिकरण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले.घटनेची माहिती इब्राहिम चौधरी यांनी दिली होती.

मारुती टायर विक्रेता हा दररोज दुकानात झोपलेला असायचा परंतु रात्री तो दुकानात झोपला नव्हता.टायर विक्री व पंक्चर काढण्याचा त्याचा व्यवसाय आहे.आज पहाटे अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि भीषण आग लागली यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.अशोक कानडे,चंद्रशेखर घुले,शांताराम घारे,राजाराम चौरे,विकास तोडकर,विशाल जाधव,सुरेश मुंडे,दिलीप कांबळे,दिनेश इंगलकर यांच्यासह ऐकून २५ कर्मचारी यांनी आगीवर नियंत्रण आणले आहे.

Story img Loader