ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील हा आरोपी २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपीचा पोलीस शोध लागत नव्हता. पण अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूील चेन्नई येथून ललित पाटील याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण : आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेनंतर एकच खळबळ उडाल्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर अनेक आरोप प्रत्यारोप होत होते. त्या सर्व घडामोडी दरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोन आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली.

ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापासून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी राजकीय नेत्यांनी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. तर, ससून रुग्णालय प्रशासनालाही धारेवर धरण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला. पंधरा दिवसांपासून फरार असलेल्या ललितला अखेर पोलिसांनी तमिळनाडूतील चेन्नई येथून अटक केली. त्यामुळे आता अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big news drug smuggler lalit patil arrested from tamil nadu mumbai police action sgk