पुण्यात बेदरकारपणे पोर्श ही अलिशान गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तसंच, न्यायलयाने अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर ताशेरेही ओढले.

१९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात पोर्श या चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया हे जोडपे जागीच मृत पावले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन मुलाच्या हाती गाडी दिल्यामुळे त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटकही केली आहे. या प्रकरणी पुण्याच्या सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आज कडोकोट बंदोबस्तात पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीत न्यायालयाने त्यांना २४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुानवली आहे.

pune crime news
पुणे: वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
baba siddiquie murder plan
Baba Siddhique Murder case: ‘असा’ रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; हल्लेखोरानं कबुलीजबाबात सांगितला संपूर्ण घटनाक्रम!
Baba Siddique murder case Zeeshan Siddique statement
Baba Siddique Murder Case : झिशान सिद्दिकींच्या जबाबात १० बिल्डर व ‘त्या’ दोन नेत्यांची नावं, पोलीस कारवाई करणार?
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू

हे चांगल्या पालकांचं लक्षण नव्हे

याप्रकरणी माहिती देताना वकील असीम सरोदे म्हणाले, “या प्रकरणात वडील आरोपी आहेत. त्यांनी वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही. गाडीवर नंबर नसताना, लायसन्स नसातनाही गाडी चालवायला दिली. १८ वर्षे नसताना पबमध्ये पाठवणं चांगल्या पालकांचं लक्षण नाही. बाल न्याय हक्कानुसार आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष केलं आहे, हे त्याचंच लक्षण आहे की मुलावर नियंत्रण ठेवलं नाही. त्यामुळे कोर्टाने २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.” अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह बारचालक आणि व्यवस्थापक यांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचा >> Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीविरोधात महाराष्ट्र परिवहन विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ वर्षांपर्यंत परवाना बंदी

दारुबंदी कलम लावलं नाही

“कोणी अपघात करेल आणि त्याला काहीच होणार नाही ही न्यायाची असमानता आहे. आम्ही कोर्टात सांगितलं की मुलाकडे परवाना नसतानाही त्याला गाडी चालवायला देणं हे पालक म्हणून अपयश आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. पालकांनी मुलाकडे लक्ष दिलं नाही. कायद्याचे एक-दोन मुद्दे आहेत. या प्रकरणात दोन एफआयआर असणेही बेकायदा आहे. आतापर्यंत चर्चा सुरू आहे. दारुबंदी कायद्याचं कलम लावलं नव्हतं”, असंही असीम सरोदे म्हणाले.

विशाल अग्रवाल यांच्यावर शाईफेक

वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या तोंडावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं आणि आरोपी बचावला. दरम्यान, कार्यकर्ते शाईफेक करू शकले नसले तरी त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले, “आरोपीला मोक्का या कायद्याअंतर्गत अटक केली पाहिजे. या बिल्डरवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत आणि आता त्याच्या मुलाने हा किळसवाणा प्रकार केला आहे.”

Story img Loader