राष्ट्रपती, पंतप्रधानपदांपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्वच निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणारे ‘बिगबॉसफेम अभिजित बिचकुले यांची पत्नी अलंकृता यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज घेतला.
हेही वाचा >>> नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना; नाट्यसंस्थांना अनुदान मिळण्याचा मार्ग खुला
कसबा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), राष्ट्रवादी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह विविध इतर पक्ष आणि अपक्षांनी अर्ज नेले आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र घेतले आहेत. मात्र, प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृतरित्या उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत मंगळवारपर्यंत (७ फेब्रुवारी) आहे, तर उमेदवारी अर्जांची छाननी ८ फेब्रुवारीला होणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.