पिंपरी : भ्रष्टाचार आणि परिवारवादावर मोठ्या गप्पा या निवडणुकीत भाजप मारत आहे. पण, जितका मोठा भ्रष्टाचारी, तितका मोठा त्याचा प्रवेश भाजपमध्ये होतो, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अंधारे आणि मावळ लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा…पुणे: आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; कात्रज-कोंढवा रस्ता येथील घटना
भाजपने यापूर्वी ज्या घोषणा केल्या, आश्वासने दिली, त्याची पूर्तता त्यांना करता आलेली नाही. इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काय झाले, दोन कोटी रोजगार निर्मितीचे, महागाई कमी करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, याचे उत्तर मतदारांना द्यावे आणि नंतर त्यांनी नव्या संकल्प पत्रावर बोलावे. परिवारवादावर बोलताना त्यांनी दिलेले उमेदवार पाहिले पाहिजेत. यापूर्वी ज्या घोषणा केल्या, आश्वासने दिली त्याची पूर्तता त्यांना करता आलेली नाही.
हेही वाचा…पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काय झाले, दोन कोटी रोजगार निर्मितीचे, महागाई कमी करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, याचे उत्तर मतदारांना द्यावे आणि नंतर त्यांनी नव्या संकल्प पत्रावर बोलावे. आश्वासने देऊन ती न पाळणे ही भाजपची पद्धत झाली आहे. जनता आता त्यांच्या अशा प्रचाराला भुलणार नाही, असे अंधारे म्हणाल्या.