पुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आलं आहे त्याचे नाव समजलेले नाही. मात्र ज्या माणसाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. बिहार एटीएसने त्याला कोर्टात हजर केलं होतं. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आला आहे. भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशा असेही त्याच्याकडे सापडलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करून भारताने या कारवाईला उत्तर दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा