पुणे : पुण्यातील कर्वेनगर भागात पायी चालत जाणाऱ्या महिलेला एका दुचाकी चालकाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रंजना प्रकाश वसवे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा… पुणे : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
हेही वाचा… पिंपरी : लग्नास नकार दिल्याने तरुणीचे नग्न फोटो व्हायरल
कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीतमध्ये राहणार्या रंजना प्रकाश वसवे या १६ मे ला रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी अचानक समोर आलेल्या बेफान दुचाकी चालकाने धडक दिली. या घटनेमध्ये रंजना प्रकाश वसवे यांच्या डोक्याला दुखापत झाली. या महिलेवर दोन दिवस उपचार केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. महिलेची काही दिवस तब्येत ठीक होती. मात्र त्या महिलेची २५ मे रोजी तब्येत बिघडल्याने पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.