पुणे : महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. नगर रस्त्यावरील खराडी भागात ही घटना घडली. अशोक दराडे (वय २५, रा. वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पुणे : महर्षीनगरमध्ये वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

प्रदीप ज्ञानदेव घुगे (वय १९, रा. वाघोली) याने या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रदीपचा आतेभाऊ अशोक दराडे दुचाकीवरून नगर रस्त्यावरील खराडी भागातून निघाला होता. त्या वेळी महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीने दुचाकीस्वार दराडेला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दराडेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या डंपरचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मोराळे अधिक तपास करत आहेत.