झाडावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढवा भागात घडली.बिरसिंग ब्रीजकिशोर कुशवाह (वय ३५, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार बिरसिंग भरधाव वेगाने रात्री मुंढवा भागातून निघाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेविआ सोसायटीसमोर एका झाडावर दुचाकीस्वार कुशवाह आदळला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कुशवाह याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे तपास करत आहेत.