मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ सिग्नलला थांबलेल्या वाहनांना सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. ट्रकने मोटारी आणि दुचाकींना धडक दिली. अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, पादचारी महिला जखमी झाली आहे. संदेश बानदा खेडकर (वय ३४ वर्षे, रा. टिळेकर नगर, कात्रज- कोंढवा रस्ता) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक पंकज राजाराम नटकरे (वय २१, रा. बसवकल्याण, बिदर, कर्नाटक) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा >>> अमली पदार्थ प्रकरणात रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना अटकेत; ललित पाटीलला पसार होण्यास मदत
नवले पूल परिसरात सिग्नलवर वाहने थांबली होती. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार संदेश गंभीर जखमी झाले, तसेच एक पादचारी महिला जखमी झाली. संदेश यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. त्यानंतरवाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती सिंहगड वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी दिली.