मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रविवारी रात्री नऊच्या सुमारास भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री आणखी दोन अपघात झाले. बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ मध्यरात्री टेम्पोने सात वाहनांना धडक दिली, तर अन्य एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. रविवारी रात्री बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात टंँकर चालकाचे नियंत्रण सुटले. टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान झाले असून काही वाहनचालक जखमी झाले आहेत. अपघातात सात ते आठ जण जखमी झाले. या अपघातानंतर पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हेही वाचा: नवले पुलाजवळ भरधाव टँकरच्या धडकेत ४८ वाहनांचे नुकसान; ७ ते ८ जणांवर उपचार सुरू

दरम्यान, मध्यरात्री नवले पूल परिसरात स्वामी नारायण मंदिराजवळ भरघाव टेम्पोने सात वाहनांना धडक दिली. अन्य एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातामुळे नवले पूल परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी झाली. बाह्यवळण मार्गावरील दरी पूल ते नवले पूल दरम्यान तीव्र उतार आहे. उतारावर वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होत असतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike rider dies in two accidents in navale bridge area seven people were injured pune print news tmb 01
Show comments