पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयुब दाऊद मुजावर (वय ५०, रा. हनुमान चौक, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत मुजावर यांचा मुलगा मोहसीन (वय २५) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार मुजावर नगर रस्त्यावरुन जात होते. आव्हाळवाडी फाट्याजवळ त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या मुजावर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike rider dies speeding vehicle accidents city roads pune print news ysh