लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महादेव बापू पिंगळे (वय २५, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस शिपाई प्रकाश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार महादेव मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरुन निघाला होता. नवीन कात्रज बोगद्यात सकाळी भरधाव ट्रकने दुचाकीस्वार महादेवला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. दुचाकीस्वार महादेवचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा… लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक कोठावळे यांची निवड

सोमवारी (१७ एप्रिल) मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर खोबरे तेल वाहतूक करणारा टँकर उलटला होता. टँकरमधील २४ हजार लिटर खोबरे तेल बाह्यवळण मार्गावर सांडल्याने रस्ता निसरडा झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन रस्ता धुतला. त्यानंतर या भागातील वाहतूक पूर्ववत झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नव्हते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike rider killed in collision with truck in new katraj tunnel near navle bridge in pune pune print news dvr