ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना तळेगाव-चाकण रस्त्यावर घडली. या अपघातानंतर अज्ञात चालक पसार झाला आहे.गजानन भगवान पवार (वय-२३, रा. वाघजाईनगर, चाकण) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास चाकण गावच्या हद्दीत आस्था रूग्णालयासमोरील रस्त्यावर हा अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली. यावेळी गजानन यांच्या अंगावरून ट्रक गेला. अपघातानंतर चालक पसार झाला, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडकर करत आहेत.