पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मार्केट यार्ड- गंगाधाम रस्त्यावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिकेत रवींद्र माेरे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत विनीत राव (वय १९, रा. काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक) याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अनिकेत मार्केटयार्ड-गंगाधाम रस्त्याने निघाला होता. त्या वेळी आईमाता मंदिराजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस्वार अनिकेतला धडक दिली. अपघातात अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत.