पुणे : दुचाकीस्वार तरुणाला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील रोकड लुटल्याची घटना संगम पूल परिसरातील लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर घडली.
याबाबत एका तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार तरुण खडकी परिसरात राहायला आहेत. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास दुचाकीस्वार तरुण संगम पूल परिसरातून निघाला होता. लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाला अडवले आणि त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. तरुणाला चाकूचा धाक दाखवून खिशातील ७५० रुपये काढले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला धमकावून आणखी पैसे मागितले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांनी १७५० रुपये घेतले. तरुणाला लुटून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करत आहेत.
हे ही वाचा… पुण्याच्या खासदारांनी टोचले कान, म्हणाल्या, ‘आवाज कमी करा… ‘
शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकीस्वारांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचारी नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
© The Indian Express (P) Ltd