पिंपरी- चिंचवड शहरामधील बाइकवेड्या तरुणाने अवघ्या ६६ तास २४ मिनिटांमध्ये तब्बल सहा हजार बारा किलोमीटरचा प्रवास करत स्वतःच्या नावावर रेकॉर्ड बनवला आहे. या अगोदर बंगळुरु येथील चेतन यांच्या नावावर रेकॉर्ड होता, त्यांनी ७८ तास ३२ मिनिटांमध्ये विक्रम केला होता. विनील खर्गेने मात्र अवघ्या ६६ तास आणि २४ मिनिटांमध्ये तब्बल ६ हजार १२ किलोमीटरचं अंतर कापत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. या अगोदर देखील अनेक रेकॉर्ड विनिल खर्गेने स्वतःच्या नावावर केले आहेत. विनिलने वाऱ्याशी स्पर्धा करत १५० किलोमीटरच्या वेगाने दुचाकी चालवली.

विनील खर्गे हा तरुण बाइक वेडा असून त्याने अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केलेले आहेत. असाच एक विक्रम नुकताच त्याने केला असून अवघ्या ६६ तास २४ मिनिटांमध्ये तब्बल सहा हजार बारा किलोमीटरचा प्रवास करत विक्रमाला गवसणी घातली. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. विनील म्हणाला, पिंपरी- चिंचवड शहरातील ताथवडे येथून हा रेकॉर्ड बनवण्यासाठी सुरुवात केली. सुरुवातीला अवघड वाटणारा हा रेकॉर्ड बघता बघता मी पूर्ण केला.

आणखी वाचा-बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

ताथवडे येथून बंगळुरू, चेन्नई, भुवनेश्वर, कोलकत्ता, वाराणसी, आग्रा, दिल्ली, जयपुर, उदयपूर, अहमदाबाद, मुंबई मग पुन्हा रिटर्न पुणे असा एकूण सहा हजार बारा किलोमीटरचा प्रवास ६६ तास आणि २४ मिनिटात केला आहे. या अगोदर बंगळुरू येथे चेतन यांच्या नावावर हा रेकॉर्ड होता. ७८ तास ३२ मिनिट वेळ घेऊन विक्रम केला होता. तो रेकॉर्ड मोडीत काढत विनीलने नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. विनीलने या अगोदर एक रेकॉर्ड केला होता. तेव्हा त्याच्यावर अनेकांनी टीका करत असे रेकॉर्ड करणे अशक्य असल्याचं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना अशा लोकांकडे मी लक्ष देत नाही. चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात आणि वाईट काम केलं तरी नावं ठेवणारच त्यामुळे मी नेहमी म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी.

Story img Loader