पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली, तसेच कात्रज भागात अपघाताच्या घटना घडल्या.नगर रस्त्यावर वाघोली परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ऋषीकुमार सिंग (वय २८, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत सिंग यांचा भाऊ गुडन सिंग (वय ४७, रा. फलपुरा, जि. सिवान, बिहार) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार ऋषीकुमार सिंग सोमवारी (५ ऑगस्ट) दुपारी पावणेएकच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाले होते. वाघोली परिसरातील बकोरी फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी अजित फरांदे तपास करत आहेत.

कात्रज भागातील आंबेगाव खुर्द भागात दुचाकीस्वार घसरून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अनिल दिनेश गोरड (वय ३२, रा. अटल चाळ, आंबेगाव खुर्द) असे मृत्यमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार अनिल रविवारी (४ ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथील अटल चाळ परिसराून निघाले होते. त्यावेळी दुचाकी घसरून गोरड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोरड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.

st bus accident pune solapur
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Two children were injured in pune Narhe due to sudden explosion while bursting firecrackers
गटारावर फटाके फोडताना स्फोट झाल्याने दोन मुले जखमी, सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना
youth was killed by minor due to a dispute over moving a bike
दुचाकी पुढे नेण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून तरुणाचा खून
Pune Kalyani Nagar porsche accident case, trial
कल्याणीनगर अपघात प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता
college youth died, bullet hit the divider in pune,
पुणे : बुलेट दुभाजकावर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू, बुलेटच्या धडकेत पादचारी ज्येष्ठासह दोघे जखमी
Three killed in accident on Vashi khadi bridge navi Mumbai news
नवी मुंबई: भीषण अपघात तीन ठार
Bengaluru building collapse
Building Collapses: पत्त्यासारखी कोसळली इमारत; ५ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक व्हिडीओ व्हायरल