लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: दुचाकी चोरणाऱ्या जळगावातील टोळीला वाकड पोलिसांनी थेरगावातून अटक केली. त्यांच्याकडून पाच लाखांच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

कमलेश भागवत परदेशी (वय २२) शुभम राजेंद्र निकम (वय २०), पुष्पक दिलीप पाटील (वय २३) आणि प्रज्वल लालजी भोसले (वय २४, सर्व रा. चिंचवड, मूळ चाळीसगाव, जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-पुणे: येरवड्यातील खुल्या कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

वाकड पोलीस थेरगाव परिसरात गस्त घालत होते. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी चोरटे थेरगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. पोलीस दिसताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी दुचाकींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. वाकड, चिखली, येरवडा, पिंपरी, चिंचवड परिसरातून दहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून पाच लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

जीपीएस यंत्रणा बसविण्याचे पोलिसांचे आवाहन

शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत. पार्किंगची व्यवस्था नसल्यास चैन, दुसरे कुलूप लावावे. जीपीएस यंत्रणा बसवून घ्यावी. वाहने सोसायटी, कंपनी, मॉल, दुकानांच्या बाहेर रोडवर लावू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike stealing gang in jalgaon jailed pune print news ggy 03 mrj
Show comments