लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गंभीर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले जाते. चित्रीकरणाद्वारे चोरट्याचा माग काढला जातो. सीसीटीव्ही चित्रीकरणात पकडले जाण्याच्या भीती वाटल्याने चोरट्याने वेशभूषा बदलून दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक, हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली. चोरट्याकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
kalyan Dombivli police
कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत
Nagpur Police seized Rs 3 crore worth of stolen goods returning them to complainants
“तुमच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले…” पोलिसांनी ३ कोटींचा मुद्देमाल…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
house burglar Incidents Balewadi, Sinhagad road area pune
घरफोडीत साडेआठ लाखांचा ऐवज चोरीला; बालेवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील घटना

मुज्जफर उर्फ सलमान रफीक पठाण (वय २३, रा. मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पठाण याने मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पठाण दुचाकी चोरी करण्यासाठी पीएमपी बसने शहराच्या वेगवेगळ्या भागात जायचा. दुचाकी चोरल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे टिपण्याची शक्यता असल्याने तो वेशभूषा बदलायचा. सीसीटीव्ही चित्रीकरणात पकडले जाण्याची भीती त्याला वाटत होती. त्यामुळे तो गुन्हा केल्यानंतर आठ ते दहा शर्ट बदलायचा. पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले.

आणखी वाचा-पुणे: नदीपात्रात गणपती विसर्जनाला मनाई; हौदांचा वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, प्रशांत धुमाळ, निखिल पवार आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader