पुणे : पुणे शहरात पोर्श कार अपघाताची घटना ताजी असताना. येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात मर्सिडीज बेंज गाडीखाली चिरडून एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

केदार मोहन चव्हाण वय ४१ असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. कारचालक नंदू अर्जुन ढवळे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा…मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेचे पुढे काय झाले? उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीवरून जात होते.त्यावेळी अचानक केदार चव्हाण यांची दुचाकी रस्त्यावर घसरली आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून आलेली मर्सिडीज बेंज कार केदार चव्हाण यांच्या अंगावर गेली आणि त्या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.त्यानंतर केदार चव्हाण यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार चालक आरोपी नंदू अर्जुन ढवळे याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.

Story img Loader