पुणे : पुणे- सातारा रोडवर एका भरधाव टेम्पोने दुचाकी चालकास जोरात धडक दिल्याची घटना घडली. या घटनेमध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून टेम्पो चालक घटना स्थळावरून पसार झाला आहे. या प्रकरणाचा सहकारनगर पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सातारा रोडवरील स्वामी विवेकानंद पुतळ्यासमोरून विजय शंकर रेळेकर हे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या घटनेमध्ये विजय रेळेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी विजय रेळेकर यांना मृत घोषित केले. दुचाकीला धडक देणारा टेम्पो चालक पसार झाला असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे सहकारनगर पोलिसांकडून सांगण्यात आले.

Story img Loader