रो-हाउसमधल्या मागच्या अंगणातील आंब्याच्या झाडाचा बुंधा, विस्तारलेल्या फांद्या यांचा अतिशय कल्पकतेने वापर करून त्यावर फळ्यांचा प्लॅटफॉर्म, त्याला छानसा लाकडी कठडा, त्यावर जाण्यासाठी सुबक लाकडी शिडी, मुलांच्या स्वप्नातलं झाडावरचं ‘मिनी घर’ ही खास सोय केली आहे मयूर भावेंनी त्यांच्या मुलीसाठी. अर्थात इथे सगळीच बच्चे कंपनी अन् मोठेही पुस्तके वाचत तासन्तास रमतात.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
Fire , Natasha Enclave Society, Kondhwa,
पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
Mumbai , Green area, sea coast , greenery,
सागरी किनारा मार्गालगत तयार करणार हरित क्षेत्र, पालिकेचा पैसा खर्च न करता हिरवळ तयार करण्यासाठी कंपन्यांकडून अर्ज
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?

स्वत: मेकॅनिकल इंजिनिअर अन् सिमेन्समध्ये मोठय़ा पदावर असूनही निसर्गात रमणारा, निसर्गासाठी झटणारा मयूर भावे, त्याची माझी भेट सहा-सात वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात झाली. जिथे मी कचरा व्यवस्थापनाविषयी माहिती दिली होती. नंतर त्याने माझी बाग बघितली अन् कचऱ्यापासून/ पाचोळ्यापासून तयार केलेल्या मातीत झाडे इतकी चांगली वाढू शकतात हे पाहून त्याने त्याच्या गच्चीवर प्रयोग सुरू केले. सोसायटीतील पालापाचोळा आणून गच्चीवर दोन विटांच्या वाफ्यात घेवडा, चवळी, कारली, दुधी भोपळा, लाल भोपळा अशा भाज्या-पालेभाज्या लावतो. ड्रममध्ये पपई, लिंबू लावले आहे. कचऱ्याचे कंपोस्टिंग स्वत:च्या घरापुरते मर्यादित न ठेवता मयूरने विविध लोकांना त्यांच्या गरजेनुसार कंपोस्टिंगची वेगवेगळी मॉडेल्स करून देण्याचा जणू विडाच उचलला आहे. टोपलीत त्याच्याकडचे कंपोस्ट घालून, कल्चर घालून झाड लावून देतो. त्यामध्ये रोज घरातला ओला कचरा घालायचा. हे कचरा खाणारे झाड लोकांना खूप आवडते. बंगल्यात उंदरांचा त्रास नको म्हणून पत्र्याचे ड्रम भोक पाडून देणे, कंपोस्ट काढणे सोपे जावे म्हणून जाळीचे बांबूचे खाली दरवाजा असलेले मॉडेल करून देणे, आवश्यक ती माहिती देणे ही शनिवार-रविवारची त्याची आवडती कामे. जुन्या बाजारातून जाळ्या आणून अंधशाळेत स्वस्त आणि मस्त मॉडेल सेट केले आहे. अर्थात त्यामुळे पाला जाळला जात नाही. मॅरेथॉनसारख्या इव्हेंटमध्ये जाऊन पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे रॅपर्स, केळ्यांची साले वेगवेगळी ठेवण्यासाठी आवाहन करतो, जेणेकरून प्रत्येक गोष्ट पुनर्वापरासाठी पाठवणे सोपे जाईल. एका मॅरेथॉनमधून आम्ही बारा पोती केळ्याची सालं आणली. सहा त्यांनी घेतली सहा मी. आमची झाडे खूश झाली.

चार वर्षांपूर्वी मयूरने बायोगॅस प्लँट बसवला. पाच किलो क्षमतेच्या प्लँटसाठी रोज भाजीवाला कचरा आणतो. घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर घरासाठी गॅस मिळू शकत नाही. त्यामुळे नियमित बाहेरून ओला कचरा आणतो. कल्पना करा, एक व्यस्त इंजिनिअर जो हिंजवडीस ऑफिसला जातो. तो येताना रोज ५ किलो कचरा घरी घेऊन येतो. काय म्हणायचे याला? यातही विविध प्रयोग करतो. कधी केटरिंगवाल्यांकडून वाया गेलेले अन्न आणायचे, कधी ऑफिसच्या कँटीनमधून सँडवीच करताना वाया गेलेल्या ब्रेडच्या कडा आणायच्या, कधी सोसायटीच्या औदुंबराच्या झाडाची उंबरे वापरायची. उंबरामुळे खूप गॅस मिळतो, असे तो आवर्जून सांगतो. शिवाय आवारात उंबरे पडून होणारा त्रासही कमी होतो हा सार्वजनिक फायदा.

सिव्हिल इंजिनिअर असलेल्या सुजाताची मयूरला प्रत्येक प्रयोगात साथ असते. ती रोजच्या स्वयंपाकासाठी चाळीस टक्के बायोगॅस वापरते. बायोगॅसमधील स्लरी झाडांसाठी उत्तम खत म्हणून वापरता येते हे नमूद करते.

आपल्या आजूबाजूच्या निसर्गाविषयीची त्याची सजगता आणखी एका गोष्टीतून जाणवली. मयूरने सोसायटीच्या आवारातील मधमाश्याचे पोळे पडलेले पाहिले अन् त्याला आइन्स्टाइनचे शब्द आठवले ‘भूतलावरच्या मधमाश्या नष्ट झाल्या की मानवही नष्ट होणार’. झाले. मयूरने घरातील तिसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत मधमाश्यांची पेटी ठेवली. मग काय, बागेत फळफळावळ वाढली. सोसायटीमध्ये पूर्वी अडीचशे किलो चिंचा मिळायच्या. आता चारशे किलो सहज मिळतात. शिवाय सहा महिन्यांनी मधही मिळतो. यासाठी दोघांनी मधमाशी पालनाचा कोर्स केला. मधमाशीतज्ज्ञ श्री. अमित गोडसे यांच्या सहकार्याने पेटी ठेवली. मधमाशी पालनासाठी काय करावे लागते? फारसे काहीच नाही. फक्त पेटी पूर्वाभिमुख ठेवायची व पावसाळ्यात थोडा साखरेचा पाक पेटीपाशी ठेवायचा इतकंच, असे मयूर सांगतो. ‘मधमाश्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्या खूप कामसू असतात. त्यांच्यासाठी व आपल्यासाठीही मधुर मध तयार करतात. पर्यावरणपूरक जीवनशैली जगताना घरात आवर्जून सोलरवर चार्ज होणारे दिवे वापरतात. थोडय़ा अंतरासाठी सायकलचाच वापर करतात. पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे, त्यात सातत्य राखणे त्यातून निरामय आनंद मिळवणे हे यांच्याकडून शिकावे. अधिकाधिक तरुण मंडळींनी सुजाता-मयूरकडून प्रेरणा घ्यावी. मयूरचे आई-वडील, मुली सगळेच निसर्गप्रेमात रंगलेले दिसतात. जीवनातील इंद्रधनुष्यी रंगाचा आनंद घेताना, समृद्ध आयुष्य जगताना समाजाला, निसर्गाला काही तरी द्यायला पाहिजे. शहरी जीवनशैली ही अधिकाधिक निसर्गस्नेही असावी, ही जाणीव यांच्यात आहे. हे खरे शाश्वत जीवनशैलीचे शिलेदार.

प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

Story img Loader