पुणे : अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ या अतितीव्र रूप धारण केलेल्या चक्रीवादळाने अनोखा विक्रम नोंदवला आहे. १९८२पासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या उच्च क्षमतेच्या चक्रीवादळांपैकी बिपरजॉय हे सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ ठरले आहे.अरबी समुद्रात बिपरजॉय या चक्रीवादळाची निर्मिती झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने या चक्रीवादळाने आगेकूच केली. तसेच या चक्रीवादळाची तीव्रताही झपाटय़ाने वाढून आता ते अतितीव्र चक्रीवादळ झाले आहे. सध्या अतितीव्र असलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊन त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होईल. १२५ ते १३५ किलोमीटर प्रति तास या वेगाने हे चक्रीवादळ गुजरात ते पाकिस्तान दरम्यानच्या किनारपट्टीवर १५ जूनला धडकण्याची शक्यता आहे. तसेच चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर होण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे अरबी समुद्र खवळल्याने मोठय़ा लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत. केंद्र सरकारच्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फर्मेशन सव्र्हिस (आयएनसीओआयएस) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार लाटांची उंची आठ मीटरपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा