छत्रपती शाहूमहाराजांची १३९ वी जयंती पुण्यात बुधवारी उत्साहाने साजरी करण्यात आली. शाहूमहाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध संघटनानी अनेक उपक्रम राबवले, संघटनांतर्फे शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
लोकनेते शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शाहूमहाराजांच्या प्रतिमेला शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी पुष्पहार अर्पण केला. शिवसंग्राम संघटनेतर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहराध्यक्ष भरत लगड, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख तुषार काकडे आणि प्रदेश सचिव शेखर पवार उपस्थित होते. भारिप बहुजन महासंघाच्या वतीने शाहूमहाराजांना अभिवादन करण्यात आले. शाहूमहाराजांचे विचार अमलात आणण्याची गरज असल्याचे मत प्रदेश उपाध्यक्ष एल. डी. भोसले यांनी या वेळी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये शाहूमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. या वेळी खासदार अॅड. वंदना चव्हाण उपस्थित होत्या. राजर्षी शाहू महाराज समाज विकास संस्थेच्या वतीने बाळासाहेब शिवरकर यांनी शाहूमहाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. शाहूमहाराजांच्या विचारांनीच बहुजन समाज आणि देशाची प्रगती होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे महानगरपालिका भवनामधील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापौर वैशाली बनकर, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे उपस्थित होते.
पुणे नवनिर्माण सेनेतर्फे पाचशे शालेय विद्यार्थ्यांना शाहूमहाराजांच्या चरित्र ग्रंथांचे वाटप करण्यात आले. इंदिरा सार्वजनिक ग्रंथालय, आनंद मंडळ दत्तवाडी, बहुजन विकास महामंडळ या संघटनांनीही शाहूमहाराजांच्या प्रतिमेलापुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिकेच्या वतीने शाहूमहाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा तसेच ढोले-पाटील क्षेत्रिय कार्यालयाला राजर्षी शाहू महाराज असे नाव देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली आहे.
शाहूमहाराजांची जयंती उत्साहात साजरी
छत्रपती शाहूमहाराजांची १३९ वी जयंती पुण्यात बुधवारी उत्साहाने साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून विविध संघटनांतर्फे शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आणखी वाचा
First published on: 27-06-2013 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday anniversary of shahu maharaj celebrated in pune