प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या बिष्णोई गँगमधील मोठे गुन्हेगार आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे या गोष्टींना तरुणांनी बळी पडू नये, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले आहे. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिष्णोई गँगचे हे गुन्हेगारी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करतात. तसेच गँगमध्ये सहभागी करून घेतात. तरुणांना आकर्षित करण्यासाठी हे गुन्हेगार सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वेगवेगळे फोटो, रिल्सचा वापर करतात. अनेक तरुण या गोष्टीला बळी पडत आहेत.

हेही वाचा : आळंदीत अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या चिमुकलीचा प्रामाणिकपणा, सापडलेलं सोन्याचं मंगळसूत्र दिलं पोलिसांकडे

अभिनव देशमुख म्हणाले, “चांगल्या घरातील तरुणही गुन्हेगारांच्या सोशल अकाऊंटला फॉलोव करतात. लाईक करणं किंवा फॉलो करणं हा गुन्हा नाही. परंतु, यातून आजच्या तरुण पीढिला कशाचं आकर्षण आहे हा ट्रेंड कळतो. नुसतं गुन्हा दाखल करून काही होणार नाही. त्या मुलांच्या पालकांचे समुपदेशन करणे देखील गरजेचं आहे.”